शरीर-मनाच्या पल्याड जात ‘व्यक्तीकडून समष्टीकडे’ नेणारा एक समृद्ध प्रवास, असंच डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या कामाचं वर्णन करावं लागेल!
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुलाखती-प्रवचनं ऐकून, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माणसाला जटील प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत व्हायची. सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा अर्थ कळायला लागायचा, माणुसकीची, चांगुलपणाची महत्ता लक्षात यायला मदत व्हायची. इतकंच नाही तर त्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, सहानुकंपेचा झेंडा खांद्यावर घेणारा नवा माणूस त्यांच्या प्रेरणेमुळे तयार व्हायचा!.......